आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-१)
भारतामध्ये आणि त्यांत प्रामुख्याने हिंदूंमध्ये आत्मा, पुनर्जन्म या गोष्टी अगदी रोमारोमांत भिनल्या आहेत. श्रीमद्भगवद्गीतेतील ‘वसे देहांत सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा’ ‘मारोत देहास परी मरेना’ आणि त्याचबरोबर ‘सांडुनिया जर्जर जीर्ण वस्त्रे, मनुष्य घेतो दुसरी नवीन। तशींचि टाकूनि जुनी शरीरें आत्माहि घेतो दुसरी निराळीं। आणि म्हणूनच ‘जन्मतां निश्चयें मृत्यु मरतां जन्म निश्चयें। असे भगवंतांनी आणि हजारो …